माझे सणजीवन!

आपल्या जीवनात सणांना किती महत्त्वाचे स्थान आहे,त्यामुळे आपले बालपण किती समृद्ध होते त्यासंबंधीच्या आठवणी वाचा ह्या लेखात.

28 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:३० PM  

काही म्हण विद्याधर, गणपतीच्या वेळेस मखर करताना, जागरण करताना जी मजा येते ती इतर सणांच्या वेळेस नाही येत. अगदी दिवाळीला सुद्धा. दिवाळीच्या दिवसांत तर मी घरातच रहाणं पसंत करते. माझ्या एका मावसबहीणीच्या हातावर दिवाळीचा तो पाऊस असतो ना, तो फुटला होता. एकदा मी रांगोळी काढत असताना समोरच्या बिल्डींगमधून आलेलं रॉकेट खिडकीवर येऊन आपटलं होतं. हे दोन प्रसंग आठवले की मला दिवाळीत बाहेर पडावसंच वाटत नाही. मी भोंड्ला मात्र खूप एन्जॉय केला आहे.

Shreya's Shop २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:४३ PM  

विभि तुझे सणजीवन वाचून एकदम बालपणात गेल्यासारखे वाटले.

Unknown २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०३ PM  

"अलहाबाद हायकोर्ट . . " उल्लेख आवडला. "पहिल्या बायकोला .. नव्या बायकोचा ... सध्याची बायको कितवी आहे?" विलेपार्ला पूर्वेतील जैन मंदिराजवळून मी, बायको व माझा चार महिन्याच्या मुलगा माझ्या बायकोच्या कडे वर, असे होळीच्या दिवसात जात असताना एका गच्चीवरून एका पाठोपाठ तिन फुगे आमच्या वर फेकले गेले. एक फुगा मुलाच्या हातावर बसला व तो वेदनांनी कळवळला होता मी खालून पाचसहा दगड वर भिरकावले होते दोन मोठ्या काचा फुटल्या होत्या. मग शिवीगाळ झाली होती.

आनंद पत्रे २३ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:३९ AM  

खुपच सुंदर, हनुमान जयंती वगळता सगळ्यांच सणांनी परत बालविश्वात नेलं...
अजुनही दिवाळी माझ्यासाठी स्पेशल आहे कारण माझे सर्व जुने मित्र दिवाळीला आवर्जुन भेटतात...

सचिन उथळे-पाटील २३ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०१ PM  

बाबा, सहजीवन मस्त रे.
एकदम मागे फिरवून आणलस.

शेवट अगदी चटका लावून गेला रे......
खरच एकट राहण्याचा खूप त्रास होतो :(....
खासकरून अशा सणाच्या दिवशी एकट असताना जुने दिवस आठवले की जाम भरून येत रे.

अनामित,  २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १:५२ PM  

वा छान योगायोग...हे का लिहल आहे ते तुला कळेलच लवकर...
सणांच्या निमित्ताने मस्त फ़िरवुन आणलस बालपणातील अनेक आठवणीतुन....

हेरंब २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:३१ AM  

बाबा, झक्कास सणजीवन रंगवलंस रे.. !! आवड्या.. शेवटचा प्यारा खूप प्यारा आहे.. कारण आम्हालाही तो लागू होतो !!

चैताली आहेर. २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:४५ AM  

एवढी पानं वाचायची....?? असा प्रश्न आधी मनात आला.... पण वाचत गेले आणि वाचतच राहिले...अगदी गुंगून गेले... प्रत्येक सण,त्यातला क्षण न्‌ क्षण डोळ्यांसमोर उभा राहीला... जणू मीच माझ्या बालपणात रमून गेले.. आणि हेच तर लेखकाचे यश असते नाही का...??? शेवटी चटका बसला मात्र...!!

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ९:१६ PM  

छान. पूर्वीं शाळांना दिवाळीच्या सुट्या पडल्या कीं मुंबैचें आकाश रंगीबेरंगी पतंगांनीं गजबजून जात असे. तें सुट्या संपेपर्यंत. कोणालाहि उपद्रव न देणारा पतंगाचा खेळ मला आवडतो. पतंग उडवतांना विचारांचे पतंगहि मस्त विहार करतात. गणपतीचे दहा नवरात्राचे दहा आणि होळीचा एक असे वर्षांतले एकवीस दिवस मात्र बीभत्सतेचें गालबोट आपल्या सणसंस्कृतीला लागतें.

असो. व्यक्ती तितक्या प्रकृती. लेख चांगला रंगला. आठवणींना उजाळा खासकरून पतंगांच्या -दिल्याबद्दल धन्यवाद.

Suhas Diwakar Zele २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:४८ PM  

विभि, फार नॉस्टॅल्जिक केलस बघ तू...गेले तीन वर्ष इथे असूनसुद्धा माझ्या जॉबमुळे मला बरेचसे सण साजरे करता आले नाहीत. मला विशेषत: आवडला तो सण म्हणजे गणेशचतुर्थी...
लहानपणापासून घरी गणपती आणा असा हेका लावलेला मी समोर आलो बघ एकदम. घरी कधी शक्य नाही झाला, पण माझ्या वर्गमित्राच्या घरच्या गणपतीला गेली २० वर्ष न चुकता जातोय..तिथे केलीली मज्जा, जागरण, मोठमोठ्या आरत्या तो उत्साह सगळा सगळा उभ केलस रे डोळ्यासमोर तू..
दिवाळीच्या खूप शुभेच्छा

अपर्णा २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:३६ PM  

छान मांडल्या आहेत आठवणी....आणि चक्क हनुमान जयंतीचाही उल्लेख आहे...माझ्या मामाकडे परंपरेने चालत आलेल्या गावातल्या हनुमान जयंतीचा उत्सव असतो....जमेल तसं गेलेय मी आणि प्रसाद मात्र सुंठेचा असतो...मागच्या हनुमान जयंतीची आईबरोबर पाठवलेली सुंठ अजूनही माझ्याकडे आहे....:) ती घरी कुटून गुळ वगैरे घालून बनवतात...

आणि शेवटाबद्दल काय म्हणू?? आपण सारे एका धाग्यांनी बांधलोय तेवढ्यासाठी.....

रोहन... ३० ऑक्टोबर, २०१० रोजी १:३९ AM  

बाबा... लेख भारीच. साध्या सोप्या आठवणी पण मला एकदम माझ्या लहानपणी घेऊन गेल्या.(आता तसा मी काही म्हातारा नाही म्हणा तरी)

संक्रांत आणि पतंग उडवणे, पाडवा - हनुमान जयंती, होळी - रंगपंचमी, गणपरी - नवरात्र आणि आपले आवडते दसरा - दिवाळी सारेच कसे साजरे केलेस एकच लेखात.

माझी दिवाळी हुकणार आहे ह्यावेळी पण तुझा लेख वाचून खूप खूप आठवणी जाग्या झाल्या... :) मस्तच. खूप आभार... :)

स्वगत : जाग्या झालेल्या आठवणी लिहायला अजून एक ब्लॉग सुरू करावा काय??? :D

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३२ PM  

सर्वप्रथम इतक्या उशीरा उत्तरांबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो.

@कांचनताई,
मखराच्या वेळेसची गंमत मी विसरणार नाहीच कधी. आणि हो, फटाक्यांच्या असंबद्ध वापरामुळे दिवाळीची मजा कमी झालीय असं वाटतं कधीकधी! :(
खूप धन्यवाद गं!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३२ PM  

श्रेयाताई,
मी स्वतःपण लिहिता लिहिता एकदम प्रत्येक आठवण जगून आलो! खूप धन्यवाद! :)

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३२ PM  

रानडेकाका,
हे फुगा प्रकरण खरोखर विकृतीकडे झुकलंय आता. मजा आणि विकृती ह्यातली सीमारेषाच पुसट झालीय हल्ली! :(
धन्यवाद काका!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३२ PM  

आनंद,
अरे हनुमान जयंती मोजक्याच घरांमध्ये साजरी केली जाते, त्यात आमच्याकडे तर प्रस्थ असतं. WWE बघत असशील तर 'Its a Family Tradition!" असं म्हणता येईल! :D

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३२ PM  

सचिन,
एकटं राहण्याचा त्रास खूप विचित्र आहे. तो बरंच काही शिकवून जात असला, तरी शेवटी तो त्रासच! जाम आठवण येते राव!
धन्यवाद भौ!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३३ PM  

देवेन,
तुझा योगायोग कळला बरं का मला! :D
धन्यवाद रे!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३३ PM  

हेरंब,
शेवटचा प्यारा सबको प्यारा! :)
धन्यवाद भावा!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३३ PM  

चैताली,
लिहिता लिहिता वाहवत गेलो होतो आणि खूपच लिहून गेलो. मग ही काळजी वाटतच होती की एव्हढं सगळं कुणी वाचेल का? पण सगळ्यांच्याच प्रतिक्रियांनी ओझं हलकं झालं डोक्यावरचं! :)
खूप खूप आभार!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३३ PM  

सुधीरकाका,
आपले सण मुळात आनंद साजरा करण्यासाठीचे. पण बदलत्या काळात अधिकाधिक लोकांना विकृतीतून आनंद मिळू लागला बहुतेक, त्यामुळे सणांचं स्वरूपही बदलत गेलं!
चालायचंच! व्यक्ति तितक्या प्रकृती हेच खरं!
धन्यवाद काका!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३४ PM  

सुहास,
अरे कुठलाही सण आला आणि आपण सगळ्यांपासून दूर असलो की एकदम आठवणी जाग्या होतात. अगदी छोट्या छोट्या तपशीलांसकट! :)
खूप धन्यवाद भाऊ!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३४ PM  

अपर्णा,
हनुमान जयंती आमच्यात मोठं प्रस्थ! लहानपणापासून बघत आलोय. आणि हो सुंठ असतेच. त्याला 'सुंठवडा' म्हणतात (पावडर असून वडा का म्हणतात ते आजवर कळलेलं नाही ;) ) पण माझी फेव्हरेट 'खिरापत'!
आणि >>आपण सारे एका धाग्यांनी बांधलोय तेवढ्यासाठी
आक्षी १००%
खूप आभार गं!

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३४ PM  

रोहन,
अरे मी गेली तीन वर्षं फक्त आठवणींवरच सगळे सण साजरे करतोय. अर्थात इथे मित्रांसोबत साजरे करतो, पण पुन्हा न येणारे ते दिवस आठवणींमधून पुन्हा अनुभवायची गंमत निराळीच! खूप धन्यवाद भौ!
आणि हो..ते स्वगत प्रत्यक्षात आणा! :)

विनायक पंडित २ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:०७ PM  

खूपच छान झाल्या आहेत आठवणी.मी माझंच लहानपण जगतोय असं वाटतंय!!! मस्तच!

अनामित,  ६ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:०८ AM  

जुन्या आठवणीना आपण उजळा दिला, सुंदर, मस्त ,

THEPROPHET ३ डिसेंबर, २०१० रोजी १०:२० PM  

विनायकजी,
खूप खूप आभार!! :)

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP