रंग माझा जांभळा !
जांभळा रंग ! लहान मुलांना कसा आहे हे एकवेळ दाखवता येईल.पण तो बनतो कसा,बनवायचा कसा हे सांगणं खूपच कठीण. ह्या लेखात आपण वाचूया तो बनवून दाखवण्याची सोपी रीत..जी मुलांनाही चटकन कळली.
© Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009
Back to TOP
34 प्रतिक्रिया:
भन्नाट.....मला आरुषला तुझ्या रंग क्लासला घालायचं आहे....त्याची आई (म्हणजे मीच अर्थात...) कलेत भोपळा आहे आणि मुलांना हे पण शिकवावं लागत हे वाचून भरलेली धडकी तुझी पद्धत पाहून जरा कमी झाली आहे...तेव्हा त्याच नाव नोंदवून ठेव..कस??
माझा नर्सरी असती ना, तर अपर्णा नक्की आरूषसोबत शिकायला आवडलं असतं! पण हे धडकी भरवणारे धडे पाहिलेस ना! मी सुद्धा मी नर्सरी काढण्याचा विचार सोडूनच दिला. एकदा लागली लॉटरी... परत लागेलच याची काय शाश्वती? :-) पण गंमत येते शिकवताना. मी कोर्समधे जे काही शिकले आहे, ते आय क्रिएटीव्ह ब्लॉगवर थोडं थोडं पोस्ट करणार आहे.
काश... आम्हालाही असं शिकता आलं असतं....
लक्ष्मीकांत, मला हे असं शिकवता आलं हेच नशीब! हल्लीची मुलं खूप स्मार्ट आहेत!
भन्नाट!
खरंच लहान मुलांना शिकवण्याची ही जबराच पद्धत आहे. लहान मुलांना काही लक्षवेधक दिसलं की ती आपोआपच त्यातून गोष्टी समजून घेतात.
आणि हो तू लहान मुलांना चांगलाच 'धडा शिकवलास!" :P
सुंदर लेख! कल्पनाशक्ति कशावरहि मात करू शकते. मला एल्फिन्सटन कॉलेजमधील पहिल्या वर्षाच्या केमिस्ट्रीच्या पहिल्या लेक्चरची आठवण आली. आमच्या प्रोफेसरनी असेच काही प्रयोग करून दाखवले होते आणि आम्ही मॅट्रिक झालेले घोडे खूप हसलो होतो व दंगा केला होता.
विद्याधर, लहान मुलांच्या याच गुणाचा फायदा मी उचलला असं म्हणायला हरकत नाही. त्या निमित्ताने मीही खूप मोठा धडा शिकले.
फडणीस काका, कल्पनाशक्ती जर बळकट असेल, तर असाध्यही साध्य होतं म्हणतात. कदाचित मोठे मोठे शास्त्रज्ञसुद्धा शोध लावण्याआधी आपली कल्पनाशक्ती वापरत असावेत. आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधताना इतके मोठे व्हायला जातो की सोप उत्तरही कठीण होऊन बसतं. साधं तेच सुंदर हे लक्षात ठेवलं की आपोआप उत्तर मिळतं.
सुंदर. आमचा चि. लहान असतांना शिकवतांनाच्या आठवणी जाग्या झाल्या.
आमच्या रुपारेलचे भिडे सरहि वर्गांत प्रयोग करून दाखवायचे. पण त्यांना थर्मामीटरवरचे बारीक आंकडे दिसत नसत. मग ते मुलांना बोलवून वाचायला सांगत. पण आम्हीं हुशार असल्यामुळें एकशें चाळीसचे एकशें ऐशी सांगत असूं. मग दुसर्याला बोलवत. तो दोनशें ऐंशी वगैरे सांगत असे आणि धमाल उडे.
मस्त लेखातून अनेक स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद. कुसुंबी रंग कोणता हो?
अरे वा! तुम्हीही धमाल केली आहे वर्गामधे. शाळेतले, बालपणीचे दिवस रम्य असतात खरे. कितीही आठवा, आनंदच मिळतो.
कुसुंबी रंग पिवळट केशरी असा असतो. साधारणपणे सुकलेल्या फुलांना जो रंग येतो, तसा.
नशीब माझं! मला हा रंग शिकवायला नाही सांगितला.
मस्त. नुसत वाचून समजावण्यापेक्षा अशा प्रयोगातून शिकताना जाम जमा येते आणि एकदम फिट समजतेही.
आमच्या चित्रकलेच्या सरांचीही अशीच पद्धत होती शिकवायची.
कांचनताई, आपल्याला नर्सरीतल्या मुलांना शिकवण्याचा जो अनुभव आला तसेच... मलाही येत असतात फ़रक इतकाच मी ज्यांना शिकवतो ते नर्सरीतले मुले नाही ...११ ते एम कोम पर्यंतचे विद्यार्थी आहेत.. पण मलाही त्यांना एखादी संकल्पना समजावून सांगताना.. उदाहरणांचाच आसरा घ्यावा लागतो... तेव्हाच त्यांच्या डोक्यात शिरते...
आपला लेख वाचून मला चटकन माझा शिकवत असलेला वर्ग डोळ्यासमोर आला ....
सचिन, शिकवता शिकवता आपण स्वत:ही शिकत असतोच. त्यामुळे शिकवताना निरनिराळे प्रयोग करणं गरजेचंच आहे. चुकांमधूनही माणूस शिकतोच.
वा! प्रथमेश, तूही शिक्षक आहेस हे मला माहित नव्हतं. लहान मुलं असो वा मोठी व्यक्ती शिकवताना सहजता व खेळकरपणा असणं आवश्यक आहे, तरंच धडा जिवंत होतो.
कांचन ताई, हे मात्र तुम्ही अगदी बरोबर म्हणालात,
खेळकरपणा तर हवाच शिवाय काही वेळेला त्यांच्या कलाकलानं किंवा त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवलेले त्यांना लगेच आणि चटकन समजते महाविद्यालयतील मुलांना शिकवायचे म्हणजे.. त्यांच्याशी खेळीमेळीने वागलो तर ते मस्ती करतात चक्क ..म्हणजे असे मला तरी जाणवले...अशावेळी मग त्यांच्यांशी सर किंवा टिचर न राहता मैत्रीपुर्वक नाते निर्माण करावे लागते... आणि मला त्याचा फ़ायदा जास्त झाला... म्हणजे एखादा सर किंवा प्राध्यापक शिकवतो यापेक्षा मीत्र शिकवतो हे बरे वाटते त्यांना ...
वा कांचन! मस्त शिकवलंस तू रंगात रंगून जाणं त्या चिमुकल्यांसोबतच वाचकांनाही. खरंच लहान मुलांना या आणि अशाच प्रात्यक्षिक पद्धतीनं शिकवलं तर ती विषयात रमतात आणि लवकर शिकतातही.
वॉव कांचन... अल्टीमेट.. !! मस्तच कल्पना !! काय सही पद्धत आहे ही शिकवण्याची.. मानलं तुला.
छान कल्पना आहे. बिएडला पण टीचींग एड्स ला खूप महत्व दिले जाते. जितकी चांगली टीचींग एड तितका जास्त आवडतो तो शिक्षक मुलांना.
छान आहे पोस्ट.
ह्या पेक्षा सोपा प्रकार लाल रंगाची काच व निळ्या रंगाची काच विजेरि समोर धरुन भिंतीवर त्या रंगाचा उजेड दाखवा. मग एका रंगाच्या काचेवर दुसरी रंगीत काच विजेरिच्या प्रकाशात एकमेकावर सरकवताना जांभळा होणार प्रकाश रंग सहज दाखवता येतो. कांचन तुझे गोष्ट सांगणे फारच छान आहे.
ताई अमेझींग एकदम...आवडली ही पद्धत, समजावून सांगायची :)
वॉट एन आयडिया मॅडमजी....लहान मुल काय मोठ्यांना सुद्धा अश्या प्रात्यक्षिकांतुनच योग्य प्रकारे समजवण्यास मदत होते.
आपल्या जीवनातील एक अनुभव व आपली वाचकांना खिळवून ठेवणारी प्रवाही लेखनशैली यामुळे हा लेख वाचनीय व महत्त्वपूर्ण असला तरी खरं सांगायचं तर आपल्या लेखातल्या काही गोष्टी मला निश्चितच खटकल्या.
सर्वप्रथम आपण जो उल्लेख केलाय की आपल्यावर शिवधनुष्य पेलण्याची वेळ आली. जांभळा रंग शिकविणे हे आपल्याला शिवधनुष्य पेलण्याएवढे अवघड वाटावे? त्यात पुढे जाऊन आपण असं नमूद केलंय की हिरवा, पिवळा अगदी निळा रंगही शिकवणंही सोपं असतं. हे वाचून मी अधिकच बुचकळ्यात पडलो. कारण जांभळा रंग दोन रंगाच्या मिश्रणातून बनल्यामुळे ते मुलांना कसं सांगावं हा तुमचा अडचणीचा भाग असेल (असं तुम्हीच पुढे लिहीलंय) तर मग हिरवा रंग शिकवणं सोपं कसं ठरू शकतं कारण तो ही पिवळा + निळा असा तयार झालाय.
त्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने लाल + निळा रंग मिश्रण करून जांभळ्या रंगाची निर्मिती करून दाखविली त्या बद्दल ची तुमची कॊमेंट "मी खुप मोठं शिखर सर केलं" आणि "इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने दोन रंगातून तयार होणारा तिसरा रंग कुणी शिकविला नसेल" ही बाईंची कॊमेंट या दोन्ही वाचून मी हतबुद्ध झालो याचं कारण म्हणजे हीच तर सर्रास वापरली जाणारी शिकविण्याची पद्धत आहे. यात नवीन असे काहीच नाही.
१९९१ मध्ये मी स्वत: आठवीत "कला निर्मिती आणि इतिहास" पुस्तक वापरलं होतं आणि पुढे १९९३ मध्ये माझ्या भावानंही तेच वापरलं होतं. महाराष्ट्र राज्य माध्य शिक्षण मंडळाने १९७६ साली निर्मिलेल्या या पुस्तकाचा वापर माझ्या आधीच्या व नंतरच्या अनेक वर्गांना शिकविण्याकरिता शिक्षकांनी वापर केलाय. (त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ व संबंधित पान आपल्या संदर्भाकरिता सोबत जोडलं आहे - http://picasaweb.google.com/chetangugale/25October2010?authkey=Gv1sRgCKDt0YTt0pHC9QE#). आमच्या काळी जरी हे शिक्षण आठवीत दिलं जात असलं तरी सध्याच्या वेगवान जमान्यात लहान मुलांना देखील याच पद्धतीने शिकविलं जातं. चित्रकलेच्या खासगी शिकवणी वर्गात तर वॊटर कलर्स (ट्यूब), पोस्टर कलर्स (बाटल्या) यातून दोन रंग डिश मध्ये एकत्र घेऊन प्राथमिक व अगदी पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देखील असंच शिकवलं जातं. (आपला हा अनुभव कुठल्या काळातला हे निश्चित कळत नसलं तरी इंटरनेटच्या उल्लेखामुळे बहुधा या पाच वर्षातील च असावा असे वाटते)
मी तर असं म्हणेन की जांभळा रंग दिल्याने तूलनेने तुमचे काम सोपे झाले होते. कारण तो कसा तयार झाला हे तुम्ही दोन रंगाच्या मिश्रणाने दाखवून देऊ शकलात. पण त्याच वेळी तुम्हाला मुलांनी लाल किंवा निळा रंग कसा बनला असे विचारले असते (असा प्रश्न विचारून आमच्या शिक्षकांना मी हैराण केल्याचे मला अजूनही स्मरते) तरी तुम्हाला अडचण नव्हती कारण तुमचे काम जांभळ्या या एकाच रंगापुरते मर्यादित होते.
अर्थात माझी ही प्रतिक्रिया तुम्हाला आवडेल की नाही ही शंका तर आहेच पण त्याहून अधिक अडचणीचा भाग असा की ही प्रतिक्रिया लिहीण्याकरिता मी जो माझ्या मुद्याच्या पुष्ट्यर्थ Data (Scanned copies of the book) गोळा करीत होतो तोवर आपल्या लेखावर प्रतिक्रियांचा जोरदार पाऊस पडला. सर्वांनी आपला लेख आवडल्याचे नमूद केले आहेच शिवाय आपली शिकविण्याची पद्धत एकदम अभिनव, फॆन्टॆस्टिक, ऎमेझिंग, भन्नाट अशी असल्याचे लिहील्यामुळे माझी एकट्याची ही सर्वथा वेगळी प्रतिक्रिया इथे मांडण्याची माझी हिंमत झालीच नाही.
आपण स्वत: जरी कदाचित माझ्या या प्रतिक्रियेला खिलाडूपणे घेतले तरी इतरांना ते नक्कीच खटकेल असे मला वाटल्याने ही प्रतिक्रिया केवळ व्यक्तिगत रीत्या आपणांसच पाठविली होती. परंतू ती वाचल्यावर आपण ती इथेच मांडण्याचा आग्रह धरल्याने इथे मांडत आहे.
http://picasaweb.google.com/chetangugale/25October2010?authkey=Gv1sRgCKDt0YTt0pHC9QE#
विनायक रानडे यांनी सूचविलेली पद्धत निश्चितच अपारंपारिक आणि जास्त सोयीची आहे.
क्रांति, लहान मुलांना शिकवताना सहज आणि त्यांना करून पहाता येईल, अशीच प्रात्याक्षिके करून दाखवणे आवश्य्क असते. हा प्रकार मुलं घरीसुद्धा सहज करून पाहू शकली असती म्हणून मी या पद्धतीची निवड केली.
हेरंब, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. यापेक्षा वेगळ्य़ा कल्पनाही होत्या पण ही पद्धत सोपी वाटली जास्त.
हे अगदी खरं बोललात. शिक्षकी पेशा जवळून पाहिला नसलेल्यांना टीचिंग एड्स हा प्रकार केवळ ऐकूनच माहित असला तर. शिक्षकाच्या पोतडीतून आता कुठली जादू बाहेर पडते हे पहायला विद्यार्थी नेहमीच उत्सुक असतात.
काका, तुम्ही सुचवलेली पद्धतही चांगली आहे. ४-५ वर्षाच्या लहान मुलांच्या हातात काच देताना सोबत मोठी माणसं हवीत शिवाय मुलांना एकदा केलं आहे तेच पुन्हा पुन्हा करण्याची व मोठयांचं अनुकरण करण्याची सवय असते. काच हा प्रकार लहान मुलांपासून नर्सरीत शक्य तितका लांबच ठेवला जातो आणि प्रशिक्षणार्थिंनी शक्यतो काच हा प्रकार प्रयोगासाठी वापरुच नये असं शिक्षिकांचं म्हणणं असतं. माझ्या धड्यात मी काच वापरली आहे पण ते काचेचे बाऊल आणि बाटल्या आहेत. ज्यांचा अॅक्सेस केवळ मलाच होता. मला ज्या पद्धतीत रंग समजावून सांगायचा होता, तिथे तेच आवश्यक होतं.
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, सुहास.
देवेंद्र, लहान मुलांना शिकवताना खूप विचार करून शिकवावं लागतं. एखादी गोष्ट जर त्यांना चुकीच्या प्रकारे शिकवली गेली तर ते चट्कन त्यांच्या मनावरून पुसलं जात नाही. मग काय चूक आणि काय बरोबर यात त्यांचा गोंधळ उडतो
चेतन, सर्वप्रथम माझ्या विनंतीवर विचार करून ईमेलवरील प्रतिक्रिया इथेही दिल्याबद्दल धन्यवाद.
मी आपल्याला सर्वप्रथ हे विचारते की आपण माझा लेख संपूर्ण आणि नीट वाचलात का? शिवधनुष्य पेलणं म्हणजे काय, याचं स्पष्टीकरण मी काय ते दिलेलं आहे. केवळ हाच मुद्दा नाही, आपण प्रतिक्रिया देताना लेखातील बरेचसे मुद्दे नीट न वाचताच प्रतिक्रिया दिली आहे. लेखातील भाग मी पुन्हा इथे प्रतिक्रियेत लिहू इच्छित नाही, तरीदेखील आपण उत्सुकतेपोटी जे प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे मी निराळ्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करते.
गडद नारिंगी म्हणजेच लाल रंग समजणारी ४-५ वर्षाची लहान मुलं, जांभळा रंग आणि निळा रंग यातील फरक चटकन समजू शकतील असं वाटतं तुम्हाला? सर्रास शिकवण्याची पद्धत लागू पडते ती अनुभविश्व आवश्यक प्रमाणात समृद्ध झालेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी. ४-५ वर्षाच्या मुलांना जिथे प्राथमिक रंगाची नावं लक्षात ठेवताना दहा वेळा उजळणी करून घ्यावी लागते, तिथे त्यांना अमूक हा रंग तमक्या दोन रंगांच्या मिश्रणातून तयार झाला आहे, हे तीच पारंपारिक पद्धत वापरून सांगताना, ती पद्धत त्यांना परिणामकारकरित्या कशी कळेल, याकडे लक्ष द्यावं लागतं. केवळ रंगच नव्हे, तर बर्याच गोष्टी लहान मुलांना सांगताना योग्य पद्धत निवडूनच सांगाव्या असं माझं मत आहे, अन्यथा त्यांचा गोंधळ उडू शकतो.
मी माझ्या लेखात असं स्पष्ट म्हटलं आहे की तो माझा कोर्स होता, मी प्रशिक्षणार्थी होते, शिक्षिका नव्हे. मला माझा धडा एका विशिष्ट वेळेत पूर्ण करायचा होता. दोन रंग डिश मध्ये एकत्र घेऊन ते मुलांना शिकवणं मला शक्य होतं, जर माझ्याकडे त्या मुलांना देण्यासाठी पुरेसा वेळ असता तर! हिरवा रंग माझ्याआधी कुणी तरी शिकवून झाला होता. जांभळा रंग मला ’देण्यात’ आला होता, असं मी म्हटलंय. शिवाय मी वापरलेली पद्धत पूर्वी कुणी वापरली नसेलच, असा माझा दावा कधीच नव्हता. पुन्हा एकदा - लेख नीट वाचा.
बाईंनी तसं कॉम्प्लिमेंट मला दिलं याचं कारण मी वापरलेली पद्धत नवी नव्हती, तर मी ती पद्धत नव्या प्रकारे वापरली होती हे आहे. अहो, नर्सरी आहे ती! तिकडे लहान मुलांसाठी भरपूर रंग आणून ठेवलेलेच असतात. आठवड्यातून एकदा तरी ही मुलं रंगामंधे मनमुराद खेळतात. पण त्यावेळेस त्यांना रंगांची नावं विचारली तर लक्षसुद्धा देणार नाहीत. हाताचा पंजा रंगात बुडवून कागदावर कसा उमटतो याकडे त्यांचं लक्ष असतं. आता हे का करून घेतलं जातं, हे इथे लिहीत बसले, तर स्वतंत्र लेखच होईल. पण असं खेळत असताना या मुलांच्या तोंडून आपणहून रंगांची नावं निघतात, तेव्हा त्यांना तो रंग समजला आहे की नाही हे कळतं.
तुम्ही ज्या वर्षी आठवीला होतात, त्या वर्षी मी बारावीला होते. तुमच्या अभ्यासक्रमापेक्षा माझा अभ्यासक्रम अंमळ जुना आहे. अर्थात, रंग शिकण्याची आणि शिकवण्याची पारंपारिक पद्धत तीच तुमच्या काळातील असल्यामुळे चित्रकलेच्या थिअरी आणि प्रॅक्टीकल्समधे शाळेतून प्रथम क्रमांक मिळविण्याचं भाग्य लाभलं आहे मला.
जर जांभळा रंग वय वर्षे ४ ते ५ च्या मुलांना शिकवणं तुम्हाला सोपं वाटत असेल, तर समोर याच वयोगटातील कमीत कमी १० मुलं, तुमचे सहप्रशिक्षणार्थी आणि तुमचे प्राध्यापक यांच्यासमोर तुम्ही सात मिनिटांत धडा शिकवा आणि तीन मिनिटांत त्या मुलांकडून प्रात्याक्षिकही करून घ्या. धडा संपला की त्या प्रत्येक मुलाला जांभळ्या रंगाचं स्पष्टीकरण उदाहरणासकट सांगता आलं पाहीजे हे जर तुम्ही यशस्वीरित्या केलंत असेल, तर तुम्ही उत्तम शिक्षक आहात.
हिरव्या रंगाची किती उदाहरणं देऊ शकता तुम्ही? त्या तुलनेत जांभळ्या रंगाची किती देता येतील? जर देता येत असतील, तर वय वर्षे ४ ते ५ च्या मुलांच्या विश्वात ती आधी येऊन गेलेली असतील का? याचाही विचार शिक्षकाला करावा लागतो. हिरव्या भाज्या, झाडं, गवत - हिरवा रंग दाखवण्यासाठी दोन रंगांचं मिश्रण करून दाखवण्याची गरजही पडली नसती. रंगांचं मिश्रण महत्त्वाचं नाही, तर तो रंग अमूक आहे आणि त्याला अमूकच म्हणतात हे त्या मुलांना समजणं जास्त महत्त्वाचं आहे. दोन रंग मिक्स करणं सोपं आहे पण तो सोदाहरण स्पष्ट करून मनात घट्ट रूजवायचा, हे जर तुम्हाला जमत असेल, तर हॅट्स ऑफ टू यू.
प्रतिक्रिया नावड्ण्यासारखं काही आढळलं नाही. मला फक्त आक्षेपार्ह मजकूर असलेल्या आणि अनामित प्रतिक्रिया आवडत नाहीत. तुम्ही तुमचे मुद्दे मांडण्यासाठी जी चित्रं दिलीत ती ईमेलवरही मिळाली. थोडी नवीन आहेत. माझ्या वेळेस यापेक्षाही जुनं मुखपृष्ठ होतं. ज्यांना हा लेख आवडला, त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे प्रतिक्रिया दिली. तुम्ही जसा लेख वाचलात तशी प्रतिक्रिया दिलीत आणि आपण इतरांपेक्षा वेगळे पडू म्हणून प्रतिक्रिया देण्याचं टाळू नका. याच कारणासाठी मी आपल्याला ही प्रतिक्रिया इथे द्या असं सुचवलं. इतरांसाठीही आपली प्रतिक्रिया व माझं उत्तर निश्चित अभ्यासपूर्ण ठरेल.
धन्यवाद.
जांभूळ हे माझं आवडतं फळ असल्यामुळे, किंवा माझ्या आईकडे त्या रंगाच्या साड्या असल्यामुळेही कदाचित पण मला अगदी लहान वयात म्हणजे बालवर्गात असतानाच जांभळा रंग आणि निळ्या रंगातील फरक फार स्पष्टपणे कळत होता. माझी संपूर्ण प्रतिक्रिया या गृहीतकावरच आधारित होती. पण इतर कुणाला त्या वयात हा रंगातला फरक समजायला अडचण होईल हा मुद्दा काही मी विचारात घेतला नाही. अर्थात तुमच्या ताज्या स्पष्टीकरणातून मला नवीन दिशा मिळाली. "गडद नारिंगी म्हणजेच लाल रंग समजणारी ४-५ वर्षाची लहान मुलं" हे वाक्य मला अगदी पटलं कारण मी स्वत: जांभळा रंग जरी फार लहानपणी ओळखू शकलो तरी गडद नारिंगीला लालच समजायचो. त्यामूळे आपल्या देशाच्या झेंड्याचा सर्वात वरचा रंग लाल आहे हेच मी पाचवीत जाईपर्यंत ठामपणे सांगत असे कारण माझ्या बुद्धीला तेच उत्तर पटत असे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं इतर काही मुलांना त्या वयात निळा आणि जांभळा रंग सारखा वाटु शकेलही कदाचित.
जांभळा रंग ओळखण्याच्या तुमच्या खुणा अगदी टिपिकल आहेत. मी बर्याच लहान मुलांना जांभूळ खाल्ल्यावर जीभ "निळी" होते असंच म्हणताना ऐकलं आहे. जांभळा रंग बर्याच मोठ्या व्यक्ती "वांगी कलर" म्हणूनच ओळखतात. दुसरा शब्दच नसतो त्यांच्याकडे. कोणताही धडा शिकवताना लहान मुलांच्या एकाग्रशक्तीचा खूप विचार करावा लागतो. नाहीतर आपण तिरकी रेषा म्हणजे "स्लान्टीन्ग लाईन" शिकवत असतो आणि त्यांना त्यावेळेस बागेच्या झोपाळ्याचा स्टॅन्ड कसा दोन स्लान्टींग लाईन्सना बांधलेला आहे हे आठवतं. गार्डन वरून मग गेम्स, गेम्स मधे पकडापकडी, मग कोणी चिटींग केलं..... गाडी अशी सुरू होऊन संपत नाहीच. धडा बाजूलाच रहातो. त्यांना प्रशिक्षणार्थी आणि शिक्षक यातला फरक कळत नसतो. फक्त ही दीदी समोर बसून छान गोष्ट सांगते किंवा या दीदीचा क्लास म्हणजे ती गाणं शिकवणार एवढं त्यांना कळतं. त्यांच्यावर धड रागावताही येत नाही, म्हणून प्रकरण थोडं नाजूक पद्धतीने हाताळावं लागतं.
खरंय. लहान मुलांच्या (विशेषत: बालवर्गातील) संकल्पना निर्मिती खूप अवघड वाटतात. परवाच एक डीजीटल ऑब्जेक्ट्सचा व्हिडीओ पाहीला. त्यात मल्टीटच प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या डीजीटल ठोकळ्यांच्या सहाय्याने जांभळ्या रंगाची निर्मिती अगदी सहजपणे एका कपातून दुसर्या कपात द्रव ओततो इतक्या सहजपणे एका ठोकळ्यातून दुसर्या ठोकळ्यात रंग ओतून तयार केलेला जांभळा रंग पाहण्यात आला. (तुला आधी माहीती असतं तर तू वर्गात डायरेक्ट तो व्हीडीओ दाखवू शकली असतीस...:-) )
अगं कसलं काय अपर्णा, आपल्याकडे काळानुरूप चालणार्या नर्सरीज अजून सुरूच नाही झालेल्या. टेक्नॉलॉजीकडे पाठच फिरवतात अशा प्रकारात. ऑडीओ-व्हिज्युअल हे आजच्या काळातलं प्रभावी माध्यम आहे. आठवड्यातून एकदा तरी याचा उपयोग नर्सरीत व्हायला हवा म्हणून मी किती वेळा रिक्वेस्ट केली पण त्यांच्या लक्षातच येत नाही. जी मुलं घरात टी.व्ही. बघताना शांत बसलेली असतात, त्या मुलांना नर्सरीमधे समोर गोलाकार बसवायचं आणि तोंडाने बोलत काही चित्र हाताने दाखवायची, हा प्रकार आता कालबाह्य ठरला आहे. पण नर्सरीत तेच चालतं. मुलं नर्सरीत ज्या खेळण्यांशी खेळतात त्यापेक्षा कितीतर अॅडव्हान्स खेळणी, खेळ त्यांना घरात उपलब्ध असतात, नर्सरी चालकांना कधी समजणार आहे कुणास ठाऊक. अॅडव्हान्स सगळं थिअरीतच, प्रॅक्टीकल नाहीच.
टिप्पणी पोस्ट करा