शिवपुजे सर!
माझी बहीण इयत्ता ९ वीत शिकत होती तेव्हापासून आम्ही सहा भावंडे श्री शिवपुजे सरांचे विद्यार्थी आहोत. तसेच आमची शाळा व सरांचे राहते घर ह्यामध्ये आमचे घर होते तेव्हा एक दिवसा आड सर आमच्या घरात येत असत. घरात आम्ही सगळेच संगीतक्षेत्रात हातपाय मारत डोके वर काढण्याच्या प्रयत्नात असल्याने मैफिल जमत असे. गावातली गायक वादक मंडळी आमच्या घरी जमत होती. श्री शिवपुजे सर मास्टर दिनानाथांच्या नाटक मंडळीत काही काळ होते. सरांचे लतादीदींशी भावा-बहिणीचे नाते होते. दीदी आमच्या गावात १९६० ते ७० ह्या कालावधीत चार पाच वेळा सरांच्या घरी भेट देऊन गेल्या होत्या. त्यावेळी सरांच्या घरासमोर दिवसभर अफाट गर्दी जमत असे, मग पोलिस जमावाला पांगवण्या करता लाठ्या उगारीत असताना मी पाहिलेले आहे. सरांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. श्री शिवपुजे सरांची ओळख करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
3 प्रतिक्रिया:
मस्त! विनायकजी तुमचे शिवपुजे सर म्हणजे एक वल्ली दिसतेय....मानलं बुवा त्यांना.
हे विडिओ रेकॉर्डिंग खूप जुनं दिसतंय..म्हणजे तुम्ही देखिल ग्रेटच दिसता...तुम्हीच केलं ना ते रेकॉर्डिंग?
माझे सर आवडल्याबद्दल धन्यवाद, व्हिडीओ चित्रण मीच केले आहे. ह्याच चित्रावर दोन्दा टिचकी दिल्यास युट्युबवर सरांचे व माझे इतर व्हिडीओ तुम्ही बघु शकाल.
शिवपुजे सरांना नमस्कार. कमालीचे कलाकार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा