संस्कृती रक्षण अभियान: एक उहापोह
संस्कृती म्हणजे नेमके काय? तिचे रक्षण करणे म्हणजे काय? अशा विषयासंबंधी सर्वंकष उहापोह वाचा ह्या लेखात.
संस्कृती म्हणजे नेमके काय? तिचे रक्षण करणे म्हणजे काय? अशा विषयासंबंधी सर्वंकष उहापोह वाचा ह्या लेखात.
© Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009
Back to TOP
8 प्रतिक्रिया:
तुझा लेख म्हणून वाचुन काढला पण खरं सांगू " अर्जून स्थिती" वाटला. अर्जूना सारखेच प्राविण्य मिळवण्याचे तुझे प्रयत्न चालू आहेत पण त्यात विचारांची खीचडी होते आहे असे जाणवते. लेखाला मर्यादा असते हे मान्य, असे विषय मांडताना खूप कसरत करावी लागते म्हणूनच खिचडी होते. अर्थात खिचडीचा स्वाद निराळा तर छान साजुक तूप-भाताचा स्वात निराळा. वेळ मिळाल्यास बोलू !
अपर्णा, संकृती रक्षण महत्त्वाचे आहेच. पण मला वाटतं बदलत्या काळानुसार संस्कृतीमधे काही बदल होत असतील तर तारतम्य पाहून स्विकारले पाहिजेत. मुळात संस्कृती म्हणजे काय? माझी सरळसोपी व्याख्या आहे - आचारविचार, जीवनशैली आणि परंपरा यांचा विशिष्ट जमातीने केलेला पुरस्कार. अश्मयुगापासून ते आतापर्यंत मानवाच्या शारिरीक रचनेत जसे बदल होत गेले, तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरही बदल होत गेले. मानवी गरजा वाढल्या तेव्हा नाईलाजास्तव काही संस्कृतीमधील काही बाबी मागे पडल्या, काही पुढे आल्या. मानव आहे म्हणून संस्कृती आहे त्यामुळे मानवाच्या गरजा आणि अडचणी यांचा संस्कृतीशी मेळ घालायचा तर काही गोष्टी मागे पुढे होणारच. पण यामुळे संस्कृती नष्ट नक्कीच होत नाही. महत्त्वाचं आहे ते आधीच्या पिढीने पुढच्या पिढीला अलगदपणे ही संस्कृतीची ठेव सोपविण्याची.
या अंकातला सर्वोत्तम लेख असेच याचे वर्णन करावे लागेल. अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. अतिशय विचारपूर्वक व मुद्देसूद असे केलेले हे लिखाण असून नक्कीच पटण्यासारखे आहे. खरे तर हा लेख ही एक सुरूवात आहे असेच आपण समजून या विषयावर अजून व्यापक प्रमाणात लिखाण करून एखाद्या लेखमालेच्या किंवा पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित करायला हवे. अशा साधक बाधक विचारांची आज प्रत्येक व्यक्तीला नितांत गरज आहे.
चांगल्या विषयावरचा लेख. असं म्हटलं जातं, की इतरांचं जबरदस्तीनं ओढून घेणं ही विकृती, आपलं आपल्यापुरतं सांभाळणं ही प्रकृती आणि आपली गरज विसरून दुसर्या गरजवंताची मदत करणं ही संस्कृती. जगाच्या पाठीवर जिथं कुठं ही मदतीची प्रवृत्ती आहे, तिथं संस्कृती आहे, आणि तिचं संरक्षण होतंय असं समजायला हरकत नसावी.
रानडे काका, कांचन, चेतन आणि क्रांती लेख वाचल्या बद्धल आणि प्रतिक्रीया दिल्या बद्धल धन्यवाद.
चेतन, खरं सांगू का माझं काही त्या विषयातील खूप ज्ञान नाहीये. त्यामुळे पुस्तक वगैरे शक्यच नाही. मी आपलं मला वाटलं ते लिहीलं. पुस्तक लिहीण्यासाठी अभ्यासपूर्ण लेखनाची गरज असते. तेवढा अभ्यास माझा याविषयाचा नाही. तसंच याविषयाचा आवाका खूप मोठा असल्याने त्यावर अधिक अभ्यास करायला सध्यातरी वेळ नाहीये. पुढेमागे कधी संधी मिळालीच तर विचार करेन.
रानडेकाका, तुम्ही कधी भेटाल ते तुम्हीच जाणे त्यामुळे सध्यातरी इथेच पोच देते. तुमची विचारकरण्याची धाटणी वेगळी आहे. मी याविषयातील तज्ज्ञ आजीबात नाही आणि माझा तसा दावाही नाही. पण असं कुठे म्ह्टलंय की फक्त तज्ज्ञ व्यक्तींनीच त्या त्या विषयावर लेख लिहावेत? असो. मी या लेखात जे काही मुद्दे मांडले आहेत त्याप्रत्येक मुद्द्याला स्पष्ट निष्कर्ष माझ्या परिने दिला आहे. कारण त्यातील अनेक मुद्द्यांवर आपण हेच बरोबर आणि हेच चूक असं लेबल नाही लावू शकत. ज्यांच्या मनात काय चूक आणि काय बरोबर ह्या गोष्टी अगदी गडद आहेत त्यांना हा लेख अर्जुन प्रकारातला वाटू शकतो. पण मला तसं वाटत नाही.
कांचन, मला असं वाटतं की तो जे प्रतिक्रीयेत म्हणाली आहेस तेच वेगळ्या शब्दांत मीही लिहीलंच आहे. मी असं कुठेच म्हणाले नाहीये की संस्कृती बदलत्या काळानुसार संस्कृतीतले बदल घ्यायचेच नाहीत. ते घेतले तर संस्कृती रक्षण होणार नाही. माझा मूळ होरा हा दांभिकपणाविरूद्ध आवाज उठवणे हा आहे. लोक एकीकडे संस्कृती रक्षणाच्या नावाने ओरडत असतात आणि दुसरीकडे त्याच्या बरोबर विरूद्ध वर्तन करत असतात. माझा विरोध त्या गोष्टीला आहे. आणि हो प्रत्येकाने आपलं आपण ठरवावं काय घ्यायचं काय नाही, आपण संस्कृती रक्षण-संवर्धन कसं करावं हे.
क्रांती तुमच्या विचाराशी सहमत.
टिप्पणी पोस्ट करा