गीताताई...माझी मोठी बहीण !
सौ गीता जोगदंड माझी मोठी बहीण पुण्यातील गोपाळ हायस्कुलात चित्रकला शिक्षिका होती एवढेच मला माहीत होते. एका सुट्टीत १९८८ ला मी पुण्यात आलो तेव्हा कळले की तिने दोन्ही हाताने एकाच वेळेला मुक्तकला काढण्याचे प्रशिक्षण वर्ग शाळेत सुरू केलेले आहेत त्याचे चित्रीकरण करत असताना ती कविता करते व तिने केलेल्या कविता आंतरशालेय स्पर्धांतून पारितोषक विजेत्या ठरल्या आहेत. त्या नंतर मी घरी आल्यावर तीच्या काही कवितांचे ती म्हणत असताना चित्रण केले होते. आज २०१० ला त्या चित्रणाच्या फिती खराब होण्या अगोदर डिजीटाईझड करण्यास सुरू केले तेव्हा हे सापडले. माझ्या ह्या आनंदात तुम्हाला सहभागी करीत आहे.
१० जानेवारी २००४ ला बायपास शस्त्रक्रियेनंतर तिने आमचा आणि ह्या जगाचा कायमचा निरोप घेतला.
5 प्रतिक्रिया:
विनायकजी, गीताताई खरंच खूप हरहुन्नरी होत्या हो. तुमच्या विडिओ रेकॉर्डिंगचीही इथे कमाल दिसतेय...मला तर वाटतंय की तुम्ही नक्कीच ह्या फिल्डमधले प्रोफेशनल असणार.
विनायकराव, तुम्ही काढलेल्या या व्हिडिओला आणि ताईंच्या कलेला तर तोड नाही. चित्रकला शिक्षिका असुन देखील कविता जबरदस्त आहेत त्यांच्या...आणि त्यांचे चित्रण तुम्ही अगदी अप्रतिम केले आहे .. प्रामाणिकपणे सांगावे तर हा व्हिडिओ पाहताना फ़ळ्यसारखी काही चित्रे किंवा अन्य काही चित्रे वगळता हा व्हीडिओ १९८८ च्या काळातला असे अजिबात वाटत नाही ..
ताईंच्या आणि तुमच्या कलेला.. माझा नमस्कार ...
रानडे साहेब,
सृजनाची प्रक्रिया तुम्हाला समजते, आवडते आणि नोंदवून ठेवावीशी वाटते हे तर महत्त्वाचे आहेच; पण ती सुरेख नोंदवून ठेवण्याचे कौशल्य तुम्ही हर प्रयासाने प्राप्त करून घेतल्याचे दिसून येते. तुमच्या या चित्रणांनी मन रमते. अपार आनंद होतो.
आपण साधारणतः सुसंगतीचा शोध घेत असतो. मात्र, विसंगतीतही आनंद शोधणार्या शिवपुजे सरांचे चित्रण आगळेच वाटले.
आत्याबाईंचे चित्रकला शिकवणे तर मी केवळ तुमच्यामुळेच अनुभवू शकलो. काश, मी त्यांचा विद्यार्थी असतो तर? मीही सुरेख चित्रे रंगवू शकलो असतो. धन्य त्या, धन्य त्यांचे विद्यार्थी, धन्य तुम्ही आणि हे सर्व पुन्हा अनुभवत असणारे आम्हीही धन्यच!
मुलात काय नाही, यापेक्षा मुलात काय आहे याचा सखोल शोध घेण्याचे त्यांचे कौशल्य अनुकरणास योग्य आहे.
ही सर्वच चित्रणे आम्हाला अस्वादार्थ उपलब्ध करून दिल्याखातर हार्दिक धन्यवाद! या सार्या अनुभवांना आमच्यापर्यंत पोहोचवण्यास कारणीभूत झालेल्या "दीपज्योती"चे आणि तिच्या निर्मात्यांचेही हार्दिक आभार आणि अभिनंदन!!
ह्या प्रतिक्रियांनी माझे डोळे आनंदाने भरून आले आहेत. तुम्हा सगळ्यांचेचे आभार. ह्याच चित्रावर दोन्दा टिचकी दिल्यास यु ट्युब वरील नोंद असलेल्या माझ्या इतर व्हिडिओ चित्रणांचा आनंद तुम्हाला मिळेल.
माझ्या संगणकावर एकही श्राव्य लेख ऐकतां आला नाहीं. त्यामुळें प्रतिक्रिया देतां येत नाहीं. क्षमस्व.
सुधीर कांदळकर
टिप्पणी पोस्ट करा