एका (फूड) ब्लॉगरची यशोगाथा....
ब्लॉगिंग हा आता तसा नवा विषय राहिलेला नाहीये. सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत ह्याची व्याप्ती पसरलेली आहे. इथे आपण एका अशा ब्लॉगरची ओळख करून घेणार आहोत जी मूळ भारतीय वंशाची आहे, मात्र तिने अमेरिकेतील फूड शोमध्ये यश संपादन केलंय...वाचा आणि प्रत्यक्ष पाहा.
आरतीचे काही विडिओ इथे पाहता येतील.
10 प्रतिक्रिया:
ही आरती खरंच चुलबुली आहे. चब्बी आणि हसरी आहे. अगं हे काम करता करता सतत बोलत रहायचं, कॅमेर्यासमोर बोलताना कसे हावभाव करतो, याचं भान राखणं हे कठीण काम आहे गं. आरतीला ते अगदी सहज जमलेलं दिसतंय. चांगल्या फूड ब्लॉगरची ओळख करून दिलीस. आता तिच्या ब्लॉगवर जात जाईन नियमीत. पिठाचा गोळा काय आपटला त्या पोरीने! :-)) समोशाची एकदम वेगळी कृती बघायला मिळाली. दुसर्या व्हिडीओतली तिची सुरी पण छान आहे. (सुरीच म्हणता ना? की आणखी काही?) दाल पण चांगली बनवली तिने.
हे असे व्हिडीओ पाहिले ना की लगेच काहीतरी करून पहायची इच्छा होते. चल, मी तिचा ब्लॉग बघूनच टाकते. आज कोजागिरीसाठी काही मिळतं का पाहू दे ;-)
कांचन, कोजागिरीसाठी तिच्याकडे काही असेल का माहित नाही कारण ती तशी फ़क्त भारतीय वंशाची आहे..पण तिने जो शो जिंकला त्यात आणि आता रविवारी लागणारा तिचा कार्यक्रम यात तिला पाहाणं हा एक आनंदी भाग असतो....:)
प्रतिक्रियेबद्द्ल आभारी.
वाह अतिशय यशस्वी आणि अनोखी वाटचाल आणि आगळवेगळा व्यक्तिमत्व..तिला जेवणाची आवड किती आहे ते तिच्या हावभावावरुन लगेच कळून येते.. :)
थॅंक्स अपर्णा ही माहिती दिल्याबद्दल ..
टीव्ही वर काही नसेल तर मी टीव्ही बंद करेन पण फूड नेटवर्क बघणार नाही असल्या पठडीतला माणूस मी. ;)
निव्वळ तुझा लेख आहे म्हणून पोस्ट वाचली आणि व्हिडिओज बघितले.. ग्रेट लेख.. आरतीचा अभिमान वाटला.. सहीच...
रच्याक, आरतीबाईंनी शिकवलेल्या डिशेस कधी करून खायला घालते आहेस आम्हाला? ;)
अपर्णा खूप खूप धन्यवाद आरतीच्या ब्लॉगची ओळख करून दिल्याबद्धल. माझंही कुकींग स्पीरीट जागृत झालं. आता सुट्टीत पुण्याला गेले की नक्कीच काहीतरी करून बघेन आणि माझ्या ब्लॉगवर छायाचित्रं किंवा चित्रफितीसकट पाककृती लिहेन. मलासुद्धा तिची सांगण्याची पद्धत आवडली. तसंच तिच्या चेहर्यावरचे भाव बघुनच ती जे काही करतेय ते खावं अशी इच्छा मनात निर्माण होते. यातच आरतीचं यश आहे. तिला त्या स्पर्धेत पारितोषिक मिळो हीच सदिच्छा.
सुहास, अगदी नेमका शब्द पकडलास बघ....."अनोखी वाटचाल"...हा लेख लिहिताना मला मुळात ती ब्लोग्गिंगच्या जगातून इथवर आली हेच जास्त अधोरेखित करायचं होत....आपल्यातूनही एखादा असा सवंगडी पुढे गेला तर त्यावर लिहायला नक्की आवडेल....
हेरंब खास लिहिल्याबद्दल आभार. कारण मुळात तू फूड टीव्ही पाहणारा नाहीयेस हे पक्कं ठाऊक आहे मला....:)
पण मग मी इतकं नमनाच तेल घातलं ते वायाच की....तुला वाटत मी पाककृतीचे शो बघून काही पदार्थपण करते??? बाकी केवळ त्यासाठी तुझी पावलं आमच्या दारी लागणार असतील तर वो भी कर लेंगे....खायची जबाबदारी (पक्षी: रिस्क) तुझी.....:)
शान्तिसुधा (अपर्णा) , प्रतिक्रियेबद्दल आभार...आरतीला बक्षीस (टीवी वर स्वतःचा शो) मिळालाय म्हणून मी हा लेख लिहिला आहे....:)
तू नक्की तुझ्या चित्रफिती/पाककृती टाक....आणि त्यासाठी पुण्याला का ग?? इथल्याच स्वयंपाकघरात नमन कर ना....:)
खाण्याचे कार्यक्रम बघायला मलाही आवडतात. पण करून पाहणं ?............बहुतेक वेळा घरातल्यांना...हे पथ्थ्याचं नाही, हे जाम खर्चिक आहे..असं म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात त्यापेक्षा धन्य वाटतं :-) अर्थात कोणी करून खायला घातलं तर चाखून त्याला दाद द्यायला काहीच हरकत नाही.
बाकी अपर्णा लेख मस्तच.
धन्यवाद श्रेया..माझंही याबाबतीत अगदी तुमच्यासारख आहे...तसं मी म्हटलंही आहे...:)
टिप्पणी पोस्ट करा