माझी माय सरसोती, मले शिकवते बोली !

वास्तववादी आणि रोजच्या जगण्यातले दाखले देणार्‍या कविता करणार्‍या ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्यांच्या कवितांचा मांडलेला हा सुंदरसा आलेख पाहा.


8 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:३६ PM  

बहीणाबाई हे माझ्या मते मराठी साहित्याला न उमगलेलं कोडं आहे, असंच मी म्हणेन. एक अशिक्षित स्त्री जेव्हा मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं म्हणते तेव्हा मनाचा आणि त्या परिस्थितीचा संबंध लावण्याचं कसब या कवयित्रीला कसं मिळालं असेल हे समजत नाही. पुन्हा त्या म्हणतात, "तुले दिले रे देवानं, दोन हात दहा बोटं..!" कुठून आली असेल, ही समज? भल्या भल्या पंडीतांना जिथे आपल्या अनुभवांचा वापर करता येत नाही, तिथे एका खेडेगावात रहाणार्‍या या संसारी स्त्रीने इतकी उच्च प्रतिची काव्यं आणि त्यातून समज कशी बरं व्यक्त केली असेल??

विशाल विजय कुलकर्णी २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:५३ PM  

खरय कांचनताई. ती एक कोडं तर आहेच पण त्याहीपेक्षा आपल्याला लाभलेली रत्नांची खाण आहे. :)

सचिन उथळे-पाटील २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:२८ PM  

दादा,
अगदी खर.
बहीणाबाई या आपल्याला लाभलेली रत्नाची खाण आहे.
साधी सरळ भाषा. याच्या कविता कधी समजावून सांगाव्याच लागल्या नाहीत.अगदी वाचतानाच कवितेचा गाभा कळून जायचा.

*आवर्जून बहिणाबाईंच्यावर लेख लिहल्याबद्दल आभार.

Suhas Diwakar Zele २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:०५ PM  

मस्तच बहिणाबाईंच्या कविता म्हणजे थेट मनाचा ठाव घेणारी..अप्रतिम लेख.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:१७ AM  

अप्रतिम. काल रात्रीं झोंप आल्यामुळें सकाळीं निवांतपणें वाचूं म्हणून आजच्यासाठीं लेख ठेवला. जेमतेम सहा वाजून गेले आहेत. सूर्योदयापूर्वींच सूर्योदय झाला असें वाटलें.

लेखाची प्रशंसा करायला शब्दच नाहींत. प्रशंसा करणारा मी कोण? एवढा नतमस्तक झालों. उथेळे पाटील म्हणतात त्याप्रमाणॆं सुबोध आणि अर्थवाही वाटल्या कविता. बोली अपरिचित असूनही अगम्य वाटत नाहीं, जन्मजन्मांतरीच्या ओळखीची वाटते. कां याला चमत्कार हें एकच उत्तर मिळतें.

सुधीर कांदळकर

Unknown २८ ऑक्टोबर, २०१० रोजी ९:२३ AM  

बहीणाबाईंच्या काव्यात नेहमीच दैनंदिन आयुष्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा बाज होता, आणि त्यातूनच त्यांच्या कविता रंगल्या

आपल्या लिखाणातून त्यांनी केलेल्या त्यांनी केलेल्या या कार्याची, आणि त्यांच्या साहित्यक्षेत्रातील योगदानाची आजच्या पिढिला नक्कीच जाण होईल..

बाकी लिखाण मस्तच जमलय

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP