एड्सचा जीवघेणा पाश !
एड्सच्या रुग्णांना सामान्य लोक तर दूर ठेवतातच पण खुद्द डॉक्टर मंडळी देखिल त्यांच्यापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतात...अशा वेळी तिथेच एक सामान्य रुग्ण म्हणून दाखल असलेला आपला लेखक मित्र काय कमाल करतो ते वाचा...ह्या सत्यकथेत.
4 प्रतिक्रिया:
भारत एका वेगळ्या कटू सत्यावर प्रकाश टाकलास बघ...आता एड्ससाठी आपल्याला दुसरे कुणी बाबा आमटे लागतील...(अर्थातच दुसऱ्याच्या घरात जन्मलेले) फक्त या आजाराबाबत जेव्हा रुग्णाने बाहेरख्यालीपणा करून ही परिस्थिती स्वत:वर आणली असते तेव्हा त्याची दया करायची का प्रश्न आहेच..अर्थात त्याची शिक्षा जेव्हा त्याच्या अश्राप बायको मुलांना मिळते त्यांच्य्साठी नक्कीच काही तरी केलं गेलं पाहिजे...
एक सुधारणा याला सत्य कथा न म्हणता सत्य घटना म्हटलं तर जास्त योग्य वाटेल असं सुचवते...:)
भारत,
एकदम वेगळंच आणि महत्वाचं असं काही तू सांगितलंस. सर्वप्रथम तू जसं वागलास त्यासाठी तुला सलाम! आणि तू वर्णन केल्यास तशा अनेक कुठलाही गुन्हा किंवा चूक नसताना आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या अनेक व्यक्तिंबद्दल वेळोवेळी वाचायला मिळतं, त्यानंही क्षणभर सुन्न व्हायला होतं आणि तू तर प्रत्यक्ष त्यांचं दुःख पाहत होतास, तुझी काय अवस्था झाली असेल! मी मात्र सुन्न झालोय वाचून!
अशा दु:खद घटना ऐकल्या, वाचल्या की इतरांचा दोष काय, हा प्रश्न मनात घर करून रहातोच. एड्सबद्दल संपूर्ण माहिती असलेले डॉक्टर्सच जिथे उदासीन वृत्ती दाखवतात, तिथे इतरांची काय कथा. तू मात्र जे केलंस ते निश्चित कौतुकास्पद आहे. तुझ्यासारख्या सुधारित विचार असलेल्या तरूणांची या देशाला खरंच गरज आहे.
हा असा भीषण प्रष्न आहे कीं ज्याला उत्तरच नाही. भारत, तुझ्या स्वच्छ दृष्टिकोनाबद्दल तुझे अभिनंदन
टिप्पणी पोस्ट करा