माझ्या माहितीप्रमाणे नोकराचा आणि सुरूचिच्या खुनापर्यंतची कथा ही सत्यकथा असावी. मध्यंतरी तशी घटना झाल्याचं वाचलं होतं वृत्तपत्रात. अर्थात घडलेलं नेमकं हेच असावं का, त्याची माहित नाही. डॉक्टरचा उल्लेख केवळ थंड रक्ताचा गुन्हेगार असाच होऊ शकतो.पण त्या एका घटनेवरून कथा मस्त गुंफली आहे. फक्त एकच त्रुटी म्हणजे सोनिया,आनंदी,योगेश यांचा उल्लेख प्रत्येकवेळी कंसात नातं लिहून करण्यापेक्षा सुरूवातीलाच एकदा पात्र परिचय केला असता आणि नंतर फक्त नामोल्लेख केला असता तर कथा जास्त ओघवती झाली असती.
मन:पूर्वक आभार! डॉक्टरच्या प्रथमपुरूषी निवेदनात कथा पुढे सरकते.स्वत:ची प्रौढी मारणे हा त्याचा स्वभाव.वाचकाना चिमटे काढण्यासाठी तो मुद्दाम कंसात आपल्या जीवनातल्या विशेष नात्यांबद्दल सांगतो.हे कथेत योजलेले आहे ती त्रुटी नाही.व्यक्तीश: वाचक आणि लेखक म्हणूनही कथेच्या ओघाला त्यामुळे अजिबात बाधा येत नाही हे माझं प्रांजळ मत. दुसरं म्हणजे आधी पात्र परिचय करायचा आणि मग कथानक सांगायचे ह्या पारंपारिक कथालेखनच्या साच्यापासून फारकत घेऊन आपण नवीन काही कधी ट्राय करणार?
या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.
3 प्रतिक्रिया:
कथानक जबरदस्त आहे...सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवलं होतं.
माझ्या माहितीप्रमाणे नोकराचा आणि सुरूचिच्या खुनापर्यंतची कथा ही सत्यकथा असावी. मध्यंतरी तशी घटना झाल्याचं वाचलं होतं वृत्तपत्रात. अर्थात घडलेलं नेमकं हेच असावं का, त्याची माहित नाही. डॉक्टरचा उल्लेख केवळ थंड रक्ताचा गुन्हेगार असाच होऊ शकतो.पण त्या एका घटनेवरून कथा मस्त गुंफली आहे. फक्त एकच त्रुटी म्हणजे सोनिया,आनंदी,योगेश यांचा उल्लेख प्रत्येकवेळी कंसात नातं लिहून करण्यापेक्षा सुरूवातीलाच एकदा पात्र परिचय केला असता आणि नंतर फक्त नामोल्लेख केला असता तर कथा जास्त ओघवती झाली असती.
मन:पूर्वक आभार!
डॉक्टरच्या प्रथमपुरूषी निवेदनात कथा पुढे सरकते.स्वत:ची प्रौढी मारणे हा त्याचा स्वभाव.वाचकाना चिमटे काढण्यासाठी तो मुद्दाम कंसात आपल्या जीवनातल्या विशेष नात्यांबद्दल सांगतो.हे कथेत योजलेले आहे ती त्रुटी नाही.व्यक्तीश: वाचक आणि लेखक म्हणूनही कथेच्या ओघाला त्यामुळे अजिबात बाधा येत नाही हे माझं प्रांजळ मत.
दुसरं म्हणजे आधी पात्र परिचय करायचा आणि मग कथानक सांगायचे ह्या पारंपारिक कथालेखनच्या साच्यापासून फारकत घेऊन आपण नवीन काही कधी ट्राय करणार?
टिप्पणी पोस्ट करा